आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल चोरी:पंपावरून 3 लाख 80 हजारांचे डिझेल चोरले

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्याने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकी तून ३ लाख ८० हजार रुपयांचे चार हजार लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत पंप सुरू होण्यापूर्वी डल्ला मारल्याची घटना केज - मांजरसुंबा महामार्गावरील मस्साजोगजवळ घडली.

तालुक्यातील मस्साजोग येथे डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्या सुभद्रा पेट्रोल पंपाचे काम सुरु आहे. सदर पंप आणखी सुरूही झालेला नाही. त्यातच चोरांनी ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी डिझेल टाकी तून ३ लाख ८० हजार रुपयांचे चार हजार लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत पंप सुरू होण्यापूर्वी डल्ला मारला. डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसांत चोरट्यांची हिंमत भलतीच वाढल्याचे या घटनेवरून दिसून येते.

आता थेट इंधन पळवण्याच्या घटनेमुळे यातील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान केज पोलिसांसमोर आहे. चोरट्यांचे नवे नवे फंडे पोलिस यंत्रणेस आव्हान देणारे ठरत आहे. थेट पेट्रोल पंपावरून िडझेलची चोरी झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...