आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणातील तफावत:अंबाजोगाई शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी वेगवेगळे तापमान

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई शहरात बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजता शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी तापमानात तफावत आढळून आली. दिव्य मराठी टीमने शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर दुपारी साडेबारा वाजता तापमान मोजले असता ते ३९ अंश सेल्सियस नोंदले गेले. दुपारी १२.५० वाजता शहरातील बसस्थानक परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर अशा दोन ठिकाणी मोजलेले तापमान चक्क ४० अंश सेल्सियसवर गेले होते.

विशेष म्हणजे दुपारी दोननंतर या दोन्ही ठिकाणच्या तापमानाचा पारा चक्क ४२ अंश सेल्सियसवर पोहचला होता. दुपारी १ वाजता शहरातील मोरेवाडी परिसरातील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात तापमान घसरून ३८ अंश सेल्सियसवर आले होते. अंबाजोगाई शहरातील ४ वेगवेगळ्या ठिकाणी केवळ वृक्षलागवडीमुळे हा फरक जाणवत असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

स्थळ : योगेश्वरी शिक्षण संस्था मैदान, अंबाजोगाई तापमान : ३९ अंश सेल्सियस वेळ : दुपारी १२:३०

अंबाजोगाई शहराच्या पूर्व दिशेला योगेश्वरी शिक्षण संस्था अाहे. येथील मैदानावर दुपारी तापमान मोजले असता पारा ३९ अंश सेल्सियसवर पोहोचलेला होता.

तापमान : कमी असण्याची कारणे सहा वर्षांपूर्वी येथील योगेश्वरी संस्थेच्या मैदानावर १२९ प्रजातींच्या चारशेहून अधिक वृक्षांची लागवड केल्याने येथे ३९ अंश तापमान नोंदवले आहे. योगेश्वरी संस्थेच्या मैदानानजीक मुख्य रस्ता असला तरी वृक्ष लागवडीमुळे हवेच्या प्रदूषणाचा धोका कमी आहे. पूर्ण वाढ झालेले एक झाड आजूबाजूच्या १०० मीटरच्या परिसराततील कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी मदत करते, असे विज्ञान शिक्षक सुनील नरसिंगे म्हणाले.

स्थळ : बसस्थानक शहर व छत्र. शिवाजी महाराज चौक तापमान : ४० अंश सेल्सियस वेळ : दुपारी १२:५० अंबाजोगाई शहरातील बसस्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुपारी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसवर पोहोचलेला होता, असे या वेळी आढळून आले.

तापमान : वाढण्याची कारणे आजूबाजूचा परिसरात मोठ्या इमारती आहे. हा परिसर सिमेंटचे जंगल बनला. येथे हवेचे प्रदूषण कायम आहे. विविध व्यावसायिकांकडून दुकाने थाटताना झाडांवर कुऱ्हाड चालवल्यान झाडांची संख्या कमी. शहरातील मुख्य मार्गावर वाढते प्रदूषण असून झाडांची संख्या अत्यंत कमी असल्याने येथे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक आहे.

स्थळ : मोरेवाडी अपर जिल्हाधिकारी कार्यालय तापमान : ३८ अंश सेल्सियस वेळ : दुपारी १ वाजता मोरेवाडीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४० अंश सेल्सियस, तर याच परिसरात ज्या ठिकाणी हजारो झाडे आहेत, तिथे ३८ अंश तापमान नोंदवले गेले आहे.

तापमान : कमी असण्याची कारणे दोन वर्षांपूर्वी दीड एकर परिसरात अटल घनवनमधून ११ हजार ६०० वृक्षांच्या लागवडीमुळे हा परिसर हिरवागार झाल्याने तापमानाची नोंद दोन अंशांनी कमी भरली आहे. मोरेवाडी परिसर शहरातील सर्वाधिक उंच भाग असून आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांमुळे व झाडांमुळे हा परिसर निसर्गतः परिपूर्ण आहे. वृक्षसंवर्धन करण्याकडे होणारे दुर्लक्ष.

बातम्या आणखी आहेत...