आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप धारुरकर यांना बीडमध्ये अनेकांनी श्रध्दांजली केली अर्पण:राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून पत्रकारिता करत चुकीच्या प्रवृत्तीवर थेट प्रहार

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय नाेकरी साेडून केवळ राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून देवगिरी तरुण भारतचे संपादक म्हणून स्व. दिलीप धारुरकर यांनी पत्रकारिता केली. त्यांनी चुकीच्या प्रवृत्तीवर थेट प्रहार या शिर्षकातून लिखान केले. तसेच संपादक असतानाही त्यांनी अनेक लेखक- साहित्यीकांना प्राेत्साहन दिले. त्यांच्या आग्रहातून मी ज्या मालिका लिहल्या त्यातूनच माझे कॉलेज कॅम्पस नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. पुढे ते महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त झाले. त्या मोठ्या पदावरुन त्यांनी संवेदनशीपणे गंभीर निर्णय घेऊन शासन लाेकहिताचे मुल्य समाजात रुजवली, अशा शब्दामध्ये साहित्यीक, लेखिका तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दीपाताई क्षीरसागर यांनी भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र राज्याचे माजी माहिती आयुक्त, संपादक, विचारवंत, लेखक, प्रभावी वक्ते, इंजिनिअर, शिक्षक, पालकत्व, मित्रत्व जपणारे आपल्या कुटुंबातील एक स्वयंसेवक वृत्तीचे मार्गदर्शक स्व. दिलीप धारूरकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (दि. 24) बीड शहरातील दीनदयाल शोध संस्थान सभागृह येथे श्रध्दांजली सभा घेण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सहित्यिक, लेखक तथा माजी नगराध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड शहर संघचालक डॉ. अनिल बारकुल, वृत्तसंपादक उमेश काळे, ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ती उपस्थित होते.

संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

डॉ. क्षीरसागर म्हणाल्या, स्व. धारुरकर यांनी पत्रकारिता ही स्वत:ला प्रसिध्दी मिळवण्यासाठी कधीच केली नाही तसेच त्यानी काेणतेही लिखान हे भडक स्वरुपाचे नव्हते. विशेषकरुन त्यांनी त्यांच्या लेखनीतून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. शासन, लोकहिताचे निर्णय त्याचबरोबर चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहार केला आहे. "शाेक करते है कुछ लाेग सुरखीयाे मे आने के लिए, हमारी खामोशी भी एक नया अकबार है" अशा पध्दतीचे त्यांच्या लिखानाबद्दल डॉ. क्षीरसागर यांनी शेर व्यक्त केला.

जुन्या आठवणींना उजाळा

वृत्तसंपादक काळे म्हणाले, स्व. धारुरकर हे संघ परंपरा, हिंदुत्ववादी विचार जपणारे होते. या गुणांची जपवणूक आयुष्यभर केली परंतु पत्रकारिता, संपादक, माहिती आयुक्त यासह विविध पदावर असताना राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून सर्व समाजाच्या विकासासाठी कार्य केले आहे. संपादक म्हणून काम करत असताना अनेक मोठे राजकिय व्यक्तींसाेबत मैत्रीपुर्ण संबंध हाेते. मात्र त्यांनी वेळ प्रसंगी राजकिय प्रहार करताना चुकीला चुकच ही भूमीका प्रखरतेने मांडली. यासह अनेक जुन्या आठवणी, अनुभव वृत्तसंपादक काळे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीड शहर संघचालक डॉ. अनिल बारकुल म्हणाले, स्व. धारुरकर यांनी पत्रकारितेची नैतीक मुल्य कशी असावीत हे भाषणांमधून सांगण्यापेक्षा स्वत:च्या जीवनामध्ये अंगीकृत करत कार्यातून नवीन पिढीच्या पत्रकारांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यभरात विविध पदव्या प्राप्त केल्या त्याच बराेबर ते एक स्वयंसेवक हाेते. असे असतानाही त्यांनी लेखनीमधून मर्यादीत लिखान न करता राष्ट्र केंद्रस्थानी ठेवून सर्व समाजाच्या विकासासाठी चुकीच्या प्रवत्तीवर थेट प्राहर केला असे सांगत डॉ. बारकुल यांनी इतर जुन्या आठवणी व्यक्त केला.

वैयक्तिक आयुष्यातील अनुभव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीडचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. सुभाष जाेशी म्हणाले, स्व. धारुरकर यांचे माेठेपण हे शब्दामध्ये मर्यादीत करता येणारे नाही. त्यांनी पत्रकारिता, संपादक, महराष्ट्र राज्याजे माहिती आयुक्त विविध ठिकाणचे त्यांचे कार्य हे प्रभावशाली आणि त्या-त्या क्षेत्रामधील नवीन येणाऱ्या पिढीसाठी प्रेणादायी तसेच कामासाठी मार्गदर्शक रचना हाेय असे सांगत डॉ. जाेशी यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव व्यक्त केले.

प्रभावीपणे कामगिरी बजावली

ज्येष्ठ संपादक दिलीप खिस्ती म्हणाले, स्व. धारुरकर यांनी आयुषभर यशस्वी पत्रकारिता केली आहे. त्यांनी अनेकांना घडवले देखील आहे. त्यांच्या राष्ट्र केंद्रस्थानी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माहिती आयुक्त पदी कार्य करण्यासाठी निवड झाली हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण होय. शासकीय कामामध्ये देखील स्व. धारुरकर यांनी ठळक आणि प्रभावीपणे कामगिरी बजावली, अशा शब्दात ज्येष्ठ संपादक खिस्ती यांनी भावना व्यक्त केल्या.

पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

दरम्यान ज्येष्ठ पत्रकार प्रमाेद कुलकर्णी, जगदीश पिंगळे, विकास उमापुरकर, सुदाम चव्हाण, दिनेश लिंबेकर यांनी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ पत्रकार अशाेक देशमुख यांचा व्हाईस शाेक संदेश यावेळी ऐकवण्यात आला. प्रास्ताविक सुशील देशमुख यांनी केले तर सुत्रसंचालन रवी उबाळे यांनी सभेची सांगता एस.एन. कुलकर्णी यांनी शांतीमंत्र पठण करुन एक मिनीट मौन बाळगून श्रध्दांजली अर्पण करुन झाली. यावेळी बीड शहरातील पत्रकार, प्रतिष्ठीत नागरिक, संघ परिवरामधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...