आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडवणी:लोककलेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांच्या माहितीची तालुक्यात चर्चा; बीड जिल्हा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा विशेष उपक्रम

प्रशासन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम व योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविणे हा उद्देश समोर ठेवून शासनाच्या वतीने लोककलेची जोपासना करणाऱ्या कला पथकांना जनजागृती करण्यास सांगितले आहे.त्या अनुषंगाने वडवणी तालुक्यातील तब्बल १८ गावांमध्ये येथील शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या १० सदस्य असलेल्या मोरनृत्य कला पथकाकडून नागरिकांमध्ये जात जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीची तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.

बीड जिल्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने वडवणी येथील शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या मोरनृत्य कला पथकाकडून वडवणी तालुक्यातील विविध १८ गावांमध्ये शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम व योजनांचा लोककलेव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमातून व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वातावरणाचे परिणाम व प्रदूषण, कोरोना महामारीबाबत आरोग्याची काळजी घेण्याविषयीची माहिती, बालविवाह बंदी कायदा, स्त्रीभ्रूण हत्या, झाडे लावा झाडे जगवा,वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, पाणी आडवा पाणी जिरवा, शेतकरी आत्महत्या, गावातील जोडरस्ते, पांदणरस्ते, अनुसूचित जाती-जमातीतील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, अनेक लाभदायक योजना, घरकुल आवास योजना, स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, आदी विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.

मोरनृत्य कला पथकाकडून शासनाच्या विविध योजनांची वडवणी तालुक्यात जनजागृती दरम्यान जर यापुढेही असेच कार्यक्रम राबविल्यास त्याबाबत अधिक जनजागृती होईल.अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाहिर जगन्नाथ रत्नपारखे यांच्या या कला पथकामध्ये प्रमुख शाहिर जगन्नाथ रत्नपारखे, पेटी वादक मुरली ओव्हाळ, ढोलकी वादक उत्तम सोनवणे, ढोलकी वादक मच्छिंद्र राऊत, गायक संताराम राठोड, कोरस अनिल सावंत, कोरस सुरेश खोटे, गायिका अरुणाबाई हाटकर, गायिका वैजंताबाई कुरकुटे, कोरस कमलबाई सोनवणे हे सदस्य या कलापथकात सहभागी झाले होते. वरील सर्व ठिकाणी १८ गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व लहान मुला-मुलींनी प्रचंड प्रतिसाद मिळाला.

बातम्या आणखी आहेत...