आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड मतदारसंघातील व शहरातील विविध नागरी विषयांबाबत आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत, पावसाळा सुरु झाल्यानंतर शहरात पाणी न साचता त्याचा योग्य पद्दतीने निचरा व्हावा यासाठी नियोजन व महाविकास आघाडी सरकारच्या सहकार्याने मंजूरी मिळालेल्या नगरोत्थान योजनेची निविदा प्रक्रिया तातडीने राबवून रस्त्यांचे व इतर कामे पूर्ण करून घ्यावीत याने शहरातील विविध प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली.तसेच शहरातील मंजूर असलेल्या उर्दू घर या योजनेसाठी शासकीय जागा उपलब्ध करण्यासाठी कार्यवाही, मंजूर झालेले अल्पसंख्याक मुलींचे वस्तीगृह तातडीने सुरु करण्यात यावे.
मतदारसंघामध्ये पेरणीच्या काळात खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी योग्य नियोजन या विषयांवर बैठक झाली. दरवर्षी शहरामध्ये पावसाळ्यात पाणी साचून पाण्याचा निचरा होत नाही परिणामी शहरात वाहतुकीस अडथळा होतो तसेच शहरात डास उत्पत्ती,रोगराई पसरते याबाबत पाण्याच्या कायमस्वरूपी निचऱ्याबाबत योग्य नियोजन करावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
यावर जिल्हाधिकारी यांनी या विषयाचा आराखडा तयार करून त्यास मंजुरी व तातडीने कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व बीड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.बीड शहरातील मंजूर उर्दू घरासाठी शासकीय जागा उपलब्ध करण्यात यावी तसेच अनेक वेळा सातत्याने पाठपुरावा करून,विशेष प्रयत्नातून मंजूर अल्पसंख्यांक समाजातील मुलींचे वसतिगृह सत्वर कार्यवाही करून सुरु करण्यात यावे अशी मागणीही आ. क्षीरसागर यांनी केली.यावरही माजी आ. धांडे, सलीम यांचीही उपस्थिती होती. यावेळी विविध विषायांवर चर्चा करुन आमदार क्षीरसागर यांनी अधाकार्यांना सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. संदीप क्षीरसागर व इतर अधिकारी.खत-बियाणांच्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना मतदारसंघांतील शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात शेतकरी बांधवाना खते-बियाणांचा पुरवठा सुरळीत यासाठी साठ्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातर्गत येणाऱ्या बीड व शिरूर तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन केल्या.यावेळी उपलब्ध असलेल्या खत-बियाणे साठ्याची माहितीही आ.संदीप क्षीरसागर यांनी घेतली.
खत-बियाणांच्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना मतदारसंघांतील शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात शेतकरी बांधवाना खते-बियाणांचा पुरवठा सुरळीत यासाठी साठ्याचे योग्य नियोजन करावे अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातर्गत येणाऱ्या बीड व शिरूर तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन केल्या.यावेळी उपलब्ध असलेल्या खत-बियाणे साठ्याची माहितीही आ.संदीप क्षीरसागर यांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. संदीप क्षीरसागर व इतर अधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.