आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:वाहतूक पोलिस यांच्यासमवेत चर्चा‎; शिवतीर्थाजवळच्या रस्त्याच्या‎ कामासाठी आमदार

बीड‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बायपास ते बायपास रस्त्याचे‎ काम सध्या सुरू आहे.या रस्त्याचे‎ काकू-नाना हॉस्पिटल पासून ते शिवतीर्थ‎ म्हणजेच शिवाजी महाराज‎ पुतळ्यापर्यंतचे काम आटोपले‎ आहे.आता पुतळ्याच्या चारही बाजुंच्या‎ रस्ताकामाला सुरूवात करण्यात येणार‎ आहे.या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर‎ यांनी मंगळवारी रस्ताकामाच्या काळात‎ व्यवस्थापनाच्या संदर्भात नियोजन केले.‎ शहरातून दोन्ही बायपास जोडणाऱ्या‎ बायपास ते बायपास रस्त्याचे काम सुरू‎ असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचे‎ काम पूर्ण झाले आहे.पुढील २ ते ३‎ आठवड्यांमध्ये पुतळ्याजवळील काम‎ पूर्ण होण्याचे नियोजन आहे.शहरातील‎ मध्यवर्ती असा हा शिवाजी महाराज चौक‎ आहे.

याठिकाणी चारही बाजूंनी वाहतूक‎ सतत सुरू असते.येथील रस्त्याचे काम‎ सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये‎ यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन‎ करण्यासाठी मंगळवारी आ.संदीप‎ क्षीरसागर स्वतः रस्त्यावर येऊन वाहतूक‎ पोलीस अधिकारी,राष्ट्रीय रस्ते विकास‎ प्राधिकरण विभागाचे अधिकारी व‎ कंत्राटदार यांच्यासोबत चर्चा केली व‎ संबंधितांना योग्य त्या सुचना केल्या.या‎ रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी‎ कंत्राटदाराला सुचना केल्या असून हे‎ काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे‎ आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी‎ बोलताना सांगितले आहे.‎ रस्ता कामासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार संदीप क्षीरसागर

बातम्या आणखी आहेत...