आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती:परवाना नूतनीकरणाचा वाद; कृउबा संचालकांचे उपोषण, पावत्या फाडल्याचा आरोप

धारुर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अनुज्ञप्तीधारकांची नूतनीकरण मुदत वेळ संपली असतानाही बेकायदेशीररीत्या सभापती, उपसभापती यांनी पावती बुक ताब्यात घेऊन पावत्या फाडल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन संचालकांनी अमरण उपोषण सुरु केले आहे.

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील अनुज्ञप्ती धारकांची नूतनीकरण मुदत ३१ मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत होती. यावेळी कार्यालयीन वेळेत अनेकांनी नियमानुसार कागदपत्रे सादर करून आपली नोंदणी करण्यात आली होती.परंतु नंतर कार्यालयीन वेळ संपल्यानंतर येथील सभापती सुनील शिनगारे व उपसभापती महादेव तोंडे यांनी येथील कर्मचारी रमेश मुंडे यांच्याकडून पावती बुक हिसकावून घेवून दबाव टाकून ताब्यात घेऊन अपूर्ण कागदपत्र असतानाही अनुज्ञप्ती नूतनीकरणाच्या पावत्या फाडल्याचा प्रकार घडला होता.

अनुज्ञप्ती नूतनीकरण प्रकरणांमध्ये पदाधिकाऱ्यांनी चुकीचा हस्तक्षेप केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची चौकशी करून संबंधित सभापती, उपसभापती यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावी या मागणीसाठी धारूर येथील बाजार समितीच्या विद्यमान संचालक प्रकाश गायकवाड, अशोक दरेकर यांनी मंगळवारी सकाळी उपोषण सुरू केले आहे.

प्रशासनाने फिरवली पाठ
दिवसभर उपोषण सुरू होते. मात्र उपोषणाला बसल्यानंतर उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास सचिव व पदाधिकारी कोणीच फिरकले नाहीत. धारूर सहाय्यक निबंधक एस डी नेहरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास संदर्भात विनंती केली होती परंतु या ठिकाणी बाजार समितीचे सचिव व पदाधिकारी नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपली भूमिका ठाम ठेवून उपोषण सुरू ठेवले होते. दरम्यान, या प्रकारामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोपामुळे धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या कारभाराची चर्चा मात्र धारुरमध्ये होत आहे.

बातम्या आणखी आहेत...