आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:मोबाइलच्या कारणावरून वाद; पत्नीचा गळा आवळून केला खून

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीत झालेल्या वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी पहाटे बीड तालुक्यातील रंजेगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ज्योती दिनेश ऊर्फ विश्वंभर आबुज (३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांच्यात आणि पती दिनेशमध्ये सातत्याने वाद होत असत. शनिवारी रात्रीही दोघांमध्ये मोबाइलच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला. मध्यरात्रीपर्यंत हा वाद सुरू होता. यातच संतापाच्या भरात दिनेशने ज्योतीला मारहाण करून तिचा दोरीने गळा आवळून खून केला. दरम्यान, यानंतर त्याने चोरीचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला.

नातेवाइकांचा आक्रोश
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ज्योतीचा मृतदेह आणल्यानंतर माहेरच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यांनी आक्रोश करत दिनेशला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आधी गुन्हा नोंदवा, मगच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. दुपारी याप्रकरणी ज्योतीचा भाऊ केदार करांडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद केला गेला.

बातम्या आणखी आहेत...