आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाधिका-यांची माहिती:जि. प. च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने 22 शिक्षक सोमवारी होणार सन्मानित

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या २२ शिक्षकांना यंदा शिक्षक दिनाच्यानिमित्ताने जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. ११ प्राथमिक शिक्षक, १० माध्यमिक शिक्षक आणि एका विशेष शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी केल्याची माहिती जि. प. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेकडून चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार दिले जातात. यंदा ८२ प्रस्ताव आले होते. निवड समितीने सुरुवातीला शाळांवर भेटी देत शिक्षकांच्या कामाची पाहणी करून मूल्यांकन केले. त्यानंतर सीईओ, शिक्षणाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीने या शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये गुणांकन करून ११ प्राथमिक, १० माध्यमिक व एका विशेष शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड केली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या पुरस्कारांना मान्यता दिली आहे. ५ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

यांना मिळाले पुरस्कार
प्राथमिक विभाग : सय्यद हाशमोद्दीन खमरोद्दीन (सायगाव, ता. अंबाजोगाई), गोरक्षनाथ लाड (आष्टी), उषा ढेरे (ढेकणमोहा, ता. बीड), गणेश तरके (आम्ला, ता. धारूर), भगवान फुंदे (उमापूर, ता. गेवराई), धम्मदिपा दरबारे (पिंपळगाव, ता. केज), सुनंदा पाचनकर (आनंदगाव, ता. माजलगाव), अण्णासाहेब खंडागळे (नफरवाडी, ता. पाटोदा), सुभाष सांगळे (धनगरवाडी, ता. शिरूर), सुवर्णा सुतार (मोरवड, ता. वडवणी)
माध्यमिक विभाग : संजय तांदळे (अंबाजोगाई), संजय काेळी (ह.ना. आष्टा, ता. आष्टी), रवींद्र देवगावकर (बीड), चांदबा भायमारे (हिंगणी, ता. धारूर), विष्णू सोळंके (गेवराई), रामकृष्ण भारती (भाटुंबा, ता. केज), बाळासाहेब सोनसळे (माजलगाव), इमनान पठाण (परळी), विजयकुमार सोळंके (डोंगरकिन्ही, ता. पाटोदा), राम वाघुंबरे (खोकरमोहा, ता. शिरूर)
विशेष शिक्षक : अमोल शिंदे (पारगाव, ता. आष्टी)

बातम्या आणखी आहेत...