आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जि. प. स्वच्छता विभागाकडून विविध उपक्रमांचे केले आयोजन

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्ताने स्वच्छता दौड, एक खड्डा शौचालयाचे रूपांतर दोन खड्ड्यात करण्यास शुभारंभ, रखडलेली सार्वजनिक शौचालयांची कामे वेगाने सुरू करणे, शौचालयाची सुविधा नसलेल्या कुटुंबांच्या नोंदी घेणे, मैला गाळ व्यवस्थापन अशा विविध उपक्रमांचे आयोजन सर्व ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिली.

जागतिक शौचालय दिनानिमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना प्राप्त होत्या त्याप्रमाणे आज स्वच्छता दौड, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या नोंदी, शौचालय पूर्ण झालेल्या कुटुंबांचे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर नोंदीसाठी विशेष उपक्रम ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आले होते असे पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत विशेष जनजागृती मोहिमेचा शुभारंभ ही झाला आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील एक खड्डा शौचालय असलेल्या कुटुंबांना दोन खड्ड्यात रूपांतर करण्यासाठीची माहिती देण्यात येणार आहे. ५०० कुटुंब संख्या असलेल्या गावात सेप्टिक टॅंक मधला मैला गाळ काढल्यानंतर तो इतरत्र टाकण्याऐवजी त्यासाठी वेगळा चर खोदून एक वर्षासाठी जमिनीखाली झाकून टाकण्याकरता जर खोदण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

अशा प्रकारचे माहिती संबंधित नगरपंचायत व नगरपालिकांना दिल्याचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर केकान यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम पूर्ण करून घेण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक विविध विभागाचे कर्मचारी, स्वच्छ भारत मिशन विभागातील गट व समूह समन्वयक आणि अंमलबजावणी सहाय्य संस्था यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...