आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांवर सातत्याने कुठले ना कुठले संकट कोसळत आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांना मदत करण्याकडे टाळाटाळ करत आहे. २०२० चा विमा अद्यापही दिला नाही. यासाठी अनेक वेळा आंदोलन-मोर्चे केले तरीही विमा कंपनीला कसलाही फरक पडला नाही. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही तर १६ ऑगस्टपासून जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रा. सुशीला मोराळेंसह आदींनी दिला आहे.

विम्याच्या संदर्भात आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. जगतकर, वसंत मुंडे, प्रकाश भन्साळी, राजाभाऊ देशमुख, अविनाश मोरे यांची उपस्थिती होती. मोराळे म्हणाल्या की, २०२० आणि २०२१ च्या विम्याची रक्कम मिळावी यासाठी २५ मोर्चे काढून अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय पातळीवर विम्याच्या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही. शेतकऱ्यांवर सातत्याने कुठले ना कुठले संकट कोसळत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम शासनाने केले पाहिजे. १५ ऑगस्टपर्यंत आम्ही सरकारला संधी देत आहोत, तोपर्यंत विम्याची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर १६ ऑगस्टला जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...