आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत नवीन पिक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. जुलै महिना संपत आला असून उसनवारी करत बि-बियाणे, खते खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून तात्काळ नवीन पिककर्ज वाटप करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद केकान यांनी केली आहे.
धारूर, माजलगाव, वडवणी व परळी तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी दिंद्रुड (ता. माजलगाव) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. जवळपास दिड महिना खरीप पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी ग्रामीण बँकेच्या विश्वासावर उसनवारी व खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेत बि-बियाणे,खते, कीटकनाशके खरेदी केली. मात्र कर्ज मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. त्रस्त शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद केकान यांनी दखल घेत शेतकऱ्यांना वेठीस न धरता लवकरात लवकर नवीन पिक कर्ज वाटप करण्याची मागणी केली असुन, यासाठी ग्रामीण बँकेने स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. अन्यथा ढिसाळ कारभाराच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.