आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवांचे वाटप:गेवराईमध्ये 271 दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे केले वाटप

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई येथील शारदा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी २७१ दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात व पायांचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर आ. अशोक पवार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण, विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान आणि साधू वासवाणी मिशन यांच्या संंयुक्त विद्यमाने दिव्यांगांना कृत्रीम अवयव वाटप शिबिर घेतले गेले होते. यात पात्र २७१ लाभार्थींना रविवारी अद्ययावत तंत्रज्ञानाने तयार केलेले अत्यंत हलके व मजबूत फायबर पासून निर्मित मोफत कृत्रिम हात व पाय या अवयवांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघाचे आ. अशोक पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, भवानी बँकेचे चेअरमन बप्पासाहेब मोटे, जि.प. सभापती बाबूराव जाधव, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, जयभवानीचे व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, साधू वासवाणी मिशनचे मिलींद जाधव, सुशील ढगे, जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती पाटीलबा मस्के, किशोर कांडेकर, जालिंदर पिसाळ, सरवर पठाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले, आजच्या शिबिरामुळे दिव्यांगांना न्याय देण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले, असे अमरसिंह पंडित प्रास्ताविकात म्हणाले. गरजू दिव्यांगांना कृत्रिम अवयव वाटप करून खऱ्या अर्थाने त्यांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांनी केले.आ. अशोक पवार यांनी आपल्या भाषणात शारदा प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. लाखो रुपये किंमतीचे कृत्रिम अवयव गरजू दिव्यांगांना वाटप करण्यासाठी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रयत्न स्तुत्य आहेत, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...