आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिरखुर्मा साहित्याचे 500 किट वाटप; राजयोग फाउंडेशनकडून रमजान ईदची गरीब कुटुंबांना मदत

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजयोग फाउंडेशनचे संस्थापक, पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धूत व शिवसेना नगरसेवक शुभम धूत यांच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेतून गत ५ वर्षांपासून हजारो कुटुंबांना दिवाळीला फराळ वाटप व ३ वर्षांपासून रमजान ईदनिमित्त शेकडो कुटुंबांना शिरखुर्मा साहित्य वाटपाचा हा हिंदू-मुस्लिम एकोपा वाढवणारा उपक्रम अविरत सुरू आहे. यावर्षी युवा नेते तथा नगरपालिका सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या साहित्य वाटपाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध भागांत जाऊन नगरसेवक शुभम धूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरखुर्मा किट वाटप केले. त्याचप्रमाणे २ वर्षे लॉकडाउन असल्याने ईद मोठ्या प्रमाणात साजरा झाली नाही, त्यावेळी देखील लॉकडाऊनमध्ये देखील राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो गरजू कुटुंबांना शिरखुर्म्याचे साहित्य उपलब्ध करून रमजान ईदचा आनंद द्विगुणित करण्यात आला होता.

यावेळी नगरसेवक शेख इक्बाल, मुश्ताक अन्सारी, संपादक अबुबकर चाऊस, शेख इसाक, अमर विद्यागर, आमेर सिद्दिकी, नबीलजमा, इक्बाल भाऊ, शारेख झकेरिया, शुभम कातांगळे, समीर तांबोळी, ऋषभ वाघमारे, अजय नाईकवाडे, काशिफ चाऊस, सय्यद आमेर, अभिजित आव्हाड, विशाल वाघमारे, गणेश गुरखुदे, वैभव जाधव, शैलेश गिरी, सागर वाहुळ, अतिश अंधारे, अभिनंदन सारडा, आदित्य सातपुते उपस्थित होते.

३००० पेक्षा जास्त कुटुंबांना अन्नधान्य
शहरातील विविध भागातील अपंग, निराधार, रोजनदारी करणाऱ्या गरजू कुटुंबांसह कब्रस्तानची देखभाल करणाऱ्या कुटुंबांचाही समावेश आहे. ३००० पेक्षा जास्त कुटुंबांना अन्नधान्य व किराणा साहित्य दिले.

बातम्या आणखी आहेत...