आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:केज येथे खासदार डॉ.प्रीतम मुंडेंच्या हस्ते बेबी किटचे वाटप, पोषण माहचे उत्साहात उद्घाटन

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित पोषण माहचे उद‌्घाटन बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या हस्ते करण्यात करून बेबी किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर, जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, डॉ. योगिनी थोरात, युवा नेते विष्णु घुले, ऋषीकेश आडसकर, भगवान केदार, डॉ. वासुदेव नेहरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, सहाय्यक गटविकास अधिकारी सविता शेप, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातांना आहार कसा दिला जातो, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. अंगणवाडीतील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना आकार, आरंभ याच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षण कशाप्रकारे देण्यात येते. हे शासनाकडून वितरित झालेल्या पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या किटच्या साहाय्याने सांगितले. तसेच लिंग गुणोत्तर प्रमाणानुसार मुलींची संख्या वाढविण्यासाठी ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ’ च्या गीताने सेविकांनी मान्यवरांचे स्वागत केले. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे यांच्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी श्रीराम जहागीरदार, पर्यवेक्षिका आशा ढवरी, सुनीता वाघमारे, केशरबाई तरकसे, सुनीता सूर्यवंशी यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...