आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान:वसंतदादा पाटील महाविद्यालयातर्फे रुग्णालयात बेबी किटचे वाटप

पाटोदा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील महाविद्यालयातर्फे ३० जुलै व १ ऑगस्ट रोजी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात व श्रद्धा हॉस्पिटल येथे कन्यारत्नास जन्म देणाऱ्या मातांना बेबी किटचे वाटप करण्यात आले.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महिला सक्षमीकरण समिती व आरोग्य समितीच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आबासाहेब हांगे, उपप्राचार्य किशोर मचाले, उपप्राचार्य गणेश पाचकोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एल. बोरा, डॉ. खाडे, डॉ. उंबासे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. यादव घोडके, आरोग्य समिती अध्यक्ष डॉ. अभय क्षीरसागर, प्रा. ज्योती क्षीरसागर, प्रा. अनिता धारासूरकर, प्रा. अर्चना चवरे, डॉ. पल्लवी इरलापल्ले, प्रा. हमराज उइके, डॉ. सय्यद शानूर, डॉ. चंद्रशेखर बनसोडे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य हांगे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...