आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाणपत्र वाटप‎:सुंदरराव सोळंके महाविद्यालयात विशेष‎ शिबिरातून जात वैधता प्रमाणपत्र वाटप‎

माजलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी‎ समिती, बीड कार्यालयाच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ३१‎ डिसेंबर २०२२ या कालावधीत विशेष शिबिर आयोजित‎ करण्यात आले आहे. या अंतर्गत सुंदरराव सोळंके‎ महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव‎ स्वीकारण्याचे व वाटप करण्याचे शिबिर आयोजित‎ करण्यात आले होते.

या कार्यक्रमात बीड जिल्हा जात‎ पडताळणी समितीचे व्यवस्थापक सुरेश शेंडगे, बार्टीचे‎ समतादूत ज्ञानेश्वर ढगे यांनी मार्गदर्शन केले. इतर‎ तालुक्यातील महाविद्यालयांनीही या विशेष शिबीरामध्ये‎ सहभागी होत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे परिपुर्ण‎ प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा जात‎ प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाच्या‎ वतीने करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...