आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप‎:जात वैधता प्रमाणपत्राचे‎ 73 विद्यार्थ्यांना वाटप‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी‎ समितीकडून सामाजिक न्याय पर्व‎ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत‎ जय भवानी माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक महाविद्यालय गढी‎ (ता.गेवराई) येथे जात वैधता‎ प्रमाणपत्र प्रस्ताव स्वीकारण्याचे व‎ वाटप करण्याचे शिबिर आयोजित‎ करण्यात आले होते.‎ सदर कार्यक्रमात जिल्हा जात‎ पडताळणी समितीचे कर्मचारी‎ सुजितकुमार वाघमारे, सय्यद आखेब,‎ मधुसूदन मस्के यांनी जात पडताळणी‎ प्रस्ताव स्विकारुन मार्गदर्शन केले.

या‎ शिबिरात गेवराई तालुक्यातील ११‎ महाविद्यालयातील ७३ विद्यार्थ्यांचे‎ प्रस्ताव स्वीकारण्यात आले. यामुळे‎ विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.‎ यावेळी गेवराई तालुक्यातील विविध‎ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी‎ उपस्थित होते. महाविद्यालयातील‎ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी‎ ची प्रक्रिया या सबंधी मार्गदर्शन‎ करण्यात आले. याच बरोबरच‎ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे‎ वाटपही करण्यात आले. जात‎ प्रमाणपत्र पडताळणीचे विशेष शिबीर‎ राबवण्यात येत आहे. संबंधित‎ तालुक्यातील महाविद्यालयांनी या‎ विशेष शिबिरामध्ये जास्तीत जास्त‎ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण‎ प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन‎ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी‎ समिती कार्यालयाकडून केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...