आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्यात विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भैय्यासाहेबांना जन्मदिनी दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडगाव चिखली येथील एकूण 25 गरजू लोकांना मौजे वडगाव(सुशी) येथे सरपंच बबन औटे यांच्या माध्यमातून गरजवंताना कपड्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान या स्तुत्य उपक्रमाबद्दल सरपंच बबनराव ओटे यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करुन आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.पांडुरंग औटे, सरपंच बबनराव ओटे, मयुरध्वज ओटे, अशोक वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वशिष्ठ काळे पाटील,विक्रम कदम, संजय काळे, नारायण यादव, रामेश्वर काळे, गहनीनाथ शिंदे, जालिंदर वारे, शिवाजी काळे यांच्यासह गावातील धर्मा काळे, प्रफुल औटे, राम काळे, बाप्पासहेब यादव, बाबूभाई सय्यद, किसन औटे, रवी तुरुकमारे, प्रसाद औटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.