आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज:पाटोद्यात 1 हजार 454 खातेधारकांना 10 कोटी 73 लाखांचे पीक कर्ज वाटप

पाटोदा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या लक्ष्मी चौक शाखेने आतापर्यंत कर्ज नूतनीकरण प्रक्रियेसह तालुक्यातील १ हजार ४५४ शेतकऱ्यांना १० कोटी ७३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून या व्यतिरिक्त शंभराहून अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले असल्याची माहिती शाखाधिकारी तुषार भोर यांनी दिली आहे. एकीकडे अनेक बँकांकडून पीक कर्जासाठी टाळाटाळ होत असताना उद्दिष्टापेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ देत शाखेने आदर्श ठेवला आहे.

पाटोदा येथे राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या एसबीआयच्या दोन शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून तालुक्यातील ७० हून अधिक गावांसाठी पीक कर्जाची प्रक्रिया राबवण्यात येते. भारतीय स्टेट बँकेच्या लक्ष्मी चौक शाखेने पीक कर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी व्यवस्थापक भोर यांच्यासह व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कर्ज मागणी अर्जांचे वाटप करण्यासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार जवळपास दीड हजारांवर शेतकऱ्यांनी प्रस्ताव बँकेकडे दाखल केले होते.

त्यातील १ हजार ४५४ शेतकऱ्यांना १० कोटी ७३ लक्ष रुपयांचे पीक कर्ज प्रत्यक्षात वाटप केले असून यापैकी १५० नवीन शेतकरी आहेत तर शंभरावर शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी दाखल केले आहेत. या प्रस्तावांनाही मंजुरी मिळाल्यावर लगेच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असेही तुषार भोर यांनी सांगितले.

भारतीय स्टेट बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक शाखेतील स्टाफने, बँकेचे रोजचे व्यवहार सांभाळून व्यवस्थापक तुषार भोर, फील्ड ऑफिसर प्रकाश शिंदे, सहायक पवन पेरणे, मदतनीस बाळासाहेब अंदुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. उद्दिष्टापेक्षा सरस कामगिरी करून शाखेने पीक कर्ज वाटप केले. यासह आणखीही काही प्रस्तावांना येत्या सप्टेंबरपर्यंत मंजुरी मिळणार आहे.

आणखी शेतकऱ्यांना लाभ देणार
शासनाच्या सूचनांनुसार बँकेकडून पीक कर्जाविषयी नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच नवीन अर्ज देखील स्वीकारणे सुरू आहे. यंदा बँकेने पीक कर्जासंदर्भात उत्तम कामगिरी केली असून सप्टेंबर अखेरपर्यंत आणखी दीडशे खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे. -तुषार भोर, व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, पाटोदा.

बातम्या आणखी आहेत...