आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिंद्रुड (ता. माजलगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय (बंडू) ठोंबरे यांच्या वतीने चार शाळेतील दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थ ्यींनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक बी.व्ही.उजगरे, जि. प. प्रा. कें. शाळेचे केंद्रप्रमुख अंबादास राठोड, प्रभारी मुख्याध्यापक शिवराज कणसे, इंदिरा गांधी कन्या शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल सोळंके यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून जवळा गावचे सरपंच त्रिंबक साबळे, पांडूरंग झोडगे, दिंद्रुड कृषक सेवा सोसायटी चेअरमन कुंडलिक मायकर, मधूकर डापकर, श्रीधर बडे, कल्याण सोळंके, चंद्रकांत झोडगे, बिभीषण शेंडगे, रवी नाईकनवरे, नितीन सोळंके, विजयकुमार शेटे, मोहन काळे, गणेश सोळंके हजर होते. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
यावेळी बंडू खांडेकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रकाश काशीद यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकवृंद कर्मचारी, पत्रकार बांधव, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बंडू ठोंबरे यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. ठोंबरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.