आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कविसंमेलन:कलारत्न पुरस्काराचे माजलगावात वितरण ; कलेला जात-धर्म नसतो : श्रीपाल सबनीस

माजलगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलेला जात, धर्म नसतो हे अण्णा भाऊंच्या कलावंत जीवनातून सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन व साठे कलारत्न पुरस्कार वितरणात उद्घाटक म्हणून रविवारी (११ सप्टेंबर) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख , तर आमदार प्रकाश सोळंके, बाबुराव पोटभरे, राजन लाखे, डॉ. धनंजय भिसे, प्रा. स्नेहल पाठक, अॅड. आर. डी. भिलेगावकर, शिरीष देशमुख, डॉ. सचिन देशमुख, कवी प्रभाकर साळेगावकर, आर. बी. देशमुख, गौतम वैराळे, सुमंत गायकवाड, उषा गायकवाड यांची उपस्थिती होती. “माझी मैना गावाकडे राहिली’ या शरद पाटोळे यांनी सादर केलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. सबनीस म्हणाले की, मार्क्सवादी विचारांची सांगड बाबासाहेबांच्या विचारांशी घालून कष्टकरी, उपेक्षित, वंचितांच्या शक्तीची बेरीज करणारे राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्या पाठीवर एकमेव अण्णाभाऊ साठे आहेत.

कलारत्न पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन कवयित्री गीता सोळंके-होके यांनी केले. सिनेअभिनेते संदिप पाठक यांचा कलारत्न पुरस्कार त्यांच्या आई प्रा.स्नेहल पाठक, डॉ. शैलेश पाठक, प्रज्ञा पाठक यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी राजन लाखे, डॉ. धनंजय भिसे, आमदार प्रकाश सोळंके, बाबुराव पोटभरे, प्रा. स्नेहल पाठक, गौतम वैराळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन हिमांशू देशमुख, प्रवीण काळे यांनी केले, तर आभार डॉ. विठ्ठल वाघ यांनी मानले. ना. मा. पडलवार यांच्या अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावरील रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...