आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रौप्य‎महोत्सवी पुण्यतिथी:कर्मयोगिनी पुरस्काराचे आज वितरण‎

पाटोदा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎सोहळ्यानिमित्त आयोजित ‎अखंड हरीनाम सप्ताहाची‎शुक्रवारी (ता.३ जानेवारी)‎ सांगता होत असून याप्रसंगी संत मीराबाई‎ आईसाहेब कर्मयोगिनी पुरस्काराने पंकजा‎ मुंडे यांचा गौरव होणार आहे.‎ संत मीराबाई आईसाहेब यांच्या २५ व्या‎ पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त महासांगवी‎ संस्थान या ठिकाणी अखंड हरीनाम‎ सप्ताहाची २७ जानेवारीपासून सुरुवात झाली‎ होती. या ठिकाणी गत ७ दिवसांपासून‎ हरीनामाचा जागर सुरु आहे.

यामध्ये अनेक‎ ख्यातनाम महिला किर्तनकारांची सेवा झाली‎ असून शुक्रवारी (ता.३ फेब्रुवारी) मठाधिपती‎ महंत राधाताई महाराज सानप यांचे काल्याचे‎ किर्तन होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे‎ आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान,‎ महिलांसाठी व समाजासाठी विशेष‎ उल्लेखनीय योगदानाबद्दल भाजपाच्या‎ राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा या‎ सोहळ्यात श्री संत मीराबाई आईसाहेब‎ कर्मयोगिनी पुरस्काराने गौरव केला जाणार‎ आहे, यावर्षीपासून प्रथमच हे पुरस्कार जाहीर‎ करण्यात आले असून पहिल्या पुरस्काराच्या‎ मानकरी या पंकजा मुंडे ठरणार आहेत.‎ यंदाच्या सोहळ्यात २५ व्या रौप्य महोत्सवी‎ वर्षानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करण्यात‎ आला असून या अखंड हरिनाम सप्ताह‎ दरम्यान मागील सात दिवसांपासून महिला‎ कीर्तनकारांनी सेवा अर्पण केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...