आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:तीनशे पेपर अन् दूध वितरकांना रेनकोट वाटप; डॉ. योगेश क्षीरसागर मित्रमंडळाचा वतीने अभिनव उपक्रम

बीड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता राेज सूर्योदयाबरोबर घरोघरी वृत्तपत्र पोहोचवण्याचा वसा आणि वारसा प्रामाणिकपणे जोपासणारे वृत्तपत्र वितरक तसेच दूध विक्रेत्यांचा पावसापासून बचाव व्हावा, याकरिता डॉ. योगेश क्षीरसागर मित्रमंडळाने मंगळवारी शहरातील बसस्थानक, सुभाष रोड येथे सर्व वृत्तपत्र वितरक आणि दूध विक्रेते यांना रेनकोट वाटप केले.

आजूबाजूच्या खेडेगावातून बीड शहरात घरोघरी नागरिकांना वृत्तपत्र आणि दूध पोहोच करणाऱ्यांना हातभार मिळावा या उद्देशाने ‘योगेश पर्व’च्या माध्यमातून ३०० रेनकोट गरजू वृत्तपत्र वितरक आणि दूध विक्रेते यांना वाटप करण्यात आल्याचे मित्रमंडळाने सांगितले. पावसाळ्यात रेनकोट दिल्याबद्दल वृत्तपत्र विक्रेते आणि दूध विक्रेते यांनी डॉ. योगेश क्षीरसागरांचे आभार मानले.

या वेळी प्रेम चांदणे, बंडू निसरगंध, डॉ. नागेश तांबारे, शुभम कातांगळे, अमर विद्यागर, ईश्वर धन्वे, भागवत बादाडे, विठ्ठल गुजर, बाळासाहेब घोडके, किरण बेदरे, मोहन राऊत, विनोद शिंदे, डॉ. योगेश क्षीरसागर मित्रमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...