आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या‎ वतीने मंगळवारी (ता.३१ जानेवारी)‎ शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप‎ याच्या अध्यक्षतेखाली व मोईन मास्टर,‎ शिवसेना नेते शेख निजाम, फारूक पटेल,‎ नगरसेवक हाफिज अश्फाक, गोरख शिंगन,‎ सुनिल सुरवसे यांच्या उपस्थितीत बांधकाम‎ कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात‎ आले.‎ नगरसेवक अमर शेख याच्या‎ मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.‎ महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम‎ कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने हा‎ उपक्रम राबवण्यात आला.

पहिल्या टप्प्यात‎ ३०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य‎ वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जगताप यांनी, बांधकाम कामगारांचा परिपूर्ण‎ विकास हाच आमचा ध्यास असल्याचे‎ सांगितले. बांधकाम कामगारासाठी अनेक‎ विविध असून कामगारांनी त्याची‎ माहिती जाणून घ्यावी. आपली सुरक्षितता‎ महत्वाची असून काम करताना बांधकाम‎ कामगारांनी सुरक्षा किट वापरावे, असे‎ आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कामगार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक शेख अमर यांनी‎ कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची‎ माहिती दिली. मोईन मास्टर, शिवसेना नेते‎ शेख निजाम, फारूक पटेल यांनीही मनोगत‎ व्यक्त केले. यावेळी गोरख शिंगन, सुनिल‎ सुरवसे हाफिज अश्फाक, मोमिन जुबेर,‎ खय्युम ईनामदार, शेख खदिर,जयंत वाघ,‎ अश्पाक शेख आदींची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...