आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वाटप:बक्षिसाच्या रकमेतून केले शालेय साहित्याचे वाटप ; माळी गल्लीमध्ये विद्यार्थ्यांना शाळा सुरू

पाटोदा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पठाण साहेब यात्रेच्या संदल निमित्त संत सावता महाराज तरुण मंडळ आला शेतकऱ्यांच्या समस्या देखाव्याचे नगरपंचायत कडून दिले जाणारे प्रथम पारितोषिक मिळाले होते या बक्षिसाच्या मिळालेल्या रकमेतून या मंडळाच्या वतीने बुधवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीम नगर माळी गल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

पाटोदा येथे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी पठाण साहेब यात्रा संपन्न झाली या यात्रेच्या पूर्वसंध्येला देखावे सादर करण्याची प्रथा आहे येथील संत सावता महाराज तरुण मंडळाच्या वतीने यंदा शेतकऱ्यांच्या समस्या हा देखावा सादर करण्यात आला होता यामध्ये या मंडळाला नगरपंचायतीच्या वतीने दिला जाणारा प्रथम पारितोषिक मिळाले होते मिळालेल्या बक्षिसाची काही रकमेतून या मंडळाकडून येथील नगर माळी गल्ली विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी बुधवार रोजी शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्याचा आदर्श व स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. माजी सभापती संदीप जाधव, रामेश्वर गोरे, , अशोक गोरे, बाप्पू शेवाळे, तात्या नाईकनवरे, युवराज जाधव भरत नाईकनवरे, उद्धव नाईकनवरे, किशोर राऊत जितेंद्र सांगळे रमेश माने यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापिका जायभाय सहशिक्षिका जाधव उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...