आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य वाटप‎:चेअरमन संदीप आंधळे यांच्या वतीने‎ अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप‎

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मादळमोही अर्बन बँकेचे‎ चेअरमन संदिप आंधळे यांच्या वतीने फेब्रुवारी‎ बालग्राम अनाथाश्रमातील मुलांना आणि जिल्हा‎ परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप‎ करण्यात आले. हे शालेय साहित्य पाचशे मुला‎ मुलींना देण्यात आले. बालग्राम अनाथाश्रमातील‎ निराधार, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य, बेघर‎ अनाथ मुलांसाठी जीवनावश्यक उपोयोगी साहित्य‎ वाटप करण्यात आले.

याचबरोबर सावरगाव येथील‎ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शंभर विद्यार्थ्यांना‎ वही, पेन, रजिस्टर, स्कूल बॅग वाटप केले. तर यावेळी‎ डॉ. सोमनाथ वाघमारे, ज्ञानेश्वर मेरड, राक्षे, भाजपा‎ नेते पवन गावडे, मादळमोही अर्बनचे व्हाईस‎ चेअरमन कैलास भुजबळ, संचालक सुरज चाळक,‎ अशोक पायघडे, युवा नेते निलेश भोपळे, सचिन‎ तळेकर सर, शाखा व्यवस्थापक फुलझलके आदींची‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...