आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर, यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते जेईई, नीट, एमएचटी-सीईटी ची तयारी करणाऱ्या व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील ३१४ विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी टॅबचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी जगदाळे, झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांचा सत्कार सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचे गायन घेण्यात आले. या प्रसंगी वासुदेव साळुंके, जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम आपल्या अभ्यासाला महत्व दिले पाहिजे. वेळेचे महत्व ओळखले पाहिजे.
आज कित्येक विद्यार्थी व्हॉट्सअॅप, फेसबुकचा वापर करुन तासं-तास आपला वेळ वाया घालवतात. व्हॉट्सअॅप आपल्या मोबाईलमधून डिलिट करावे. मोबाईलचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा. यशाची मधुर फळे चाखायची असतील तर कठोर मेहनत व वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मण बारगजे यांनी केले. यावेळी अनेक पालक, विद्यार्थी तसेच समाज कल्याण सहा.आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.