आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटोदा तालुका भाजपाच्या वतीने तांबाराजुरी येथील मुकबधीर आणि मंतीमंद निवासी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीवेतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या आवाहनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांबाराजुरीचे विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विठ्ठल तांबे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर गर्जे, पांडुरंग नागरगोजे, भाजपचे नेते काकासाहेब लांबरूड, सुधीर सोनवणे, सुरेंद्र नागरगोजे, भाजपचे युवा नेते शामराव हुले, राजपाल शेंडगे, रणधीर जाधव, आंण्णासाहेब भोसले, पत्रकार विजय जाधव, शेख जावेद, शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग खोसे, विशाल सुपेकर, डॉ.बलभीम तांबे, राहुल वनवे, सय्यद वाहेद, सय्यद अझहर, वसंत चौरे, पारभरे प्रदीप,साळवे श्रीवास, मानिक नवले, बबन वीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अॅड.सुशील कोठेकर यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अँड सुधीर घुमरे यांनीही पंकजा मुंडे यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवल्याचे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.