आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सोमवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे होणार वितरण; स्व.सुवालाल वाकेकर पुरस्कार मंत्री धनंजय मुंडे

परळी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजभुषण स्व. सुवालाल वाकेकर (ललवाणी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मारवाडी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असुन यावर्षीचा पुरस्कार राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री तथा नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष धनंजय मुंडे (राज्यभूषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक दासू वैद्य (साहित्य भूषण) यांना स्व. सुवालाल वाकेकर पुस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे वितरण २७ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम महाराज गुट्टे व प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री तथा महाराष्ट प्रादेशिक मारवाडी संमेलन चे प्रदेशाध्यक्ष राज के. पुरोहित, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलन चे संघटन मंत्री वीरेंद्रप्रकाश धोका उपस्थित राहणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार्याध्यक्ष विजय वाकेकर, सचिव जयपाल लाहोटी यांनी सांगितले.

मारवाडी युवा मंचच्या वतीने समाजभुषण स्व. सुवालाल वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. पुरस्कारांचे हे १८ वे वर्ष असून सोमवारी रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. याच कार्यक्रमात स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्टानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना २५ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

धनंजय मुंडे यांनी अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा, विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्तचे महोत्सव घेतात. रमेश कनकमल फिरोदीया हे अहमदनगर येथील असून ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. उद्योग, व्यवसाय आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रा. दासू वैद्य यांचे बाल साहित्य प्रसिद्ध असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे विभाग प्रमुख कार्यरत आहेत. अनेक चित्रपटासाठी त्यांनी गीते लिहिली आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन धरमचंद बडेरा,सतिश सारडा,प्रा.मधु जामकर, प्रा.कपुरचंद पोकर्णा, प्रा.शांती लाहोटी,अरुण पवार व मारवाडी युवा मंच परळीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...