आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:जिल्हाप्रमुख खांडेंचा सलीम जहांगीर यांच्याकडून सत्कार

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या शिंदे गटाचे शिलेदार तथा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाजपच्या वतीने सलीम जहाँगीर यांनी सत्कार केला. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नाते नव्या परिवर्तनाची नांदी ठरेल, अशा भावना या वेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी व्यक्त केली.

बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची नियुक्ती झाली. भाजपच्या वतीने सलीम जहाँगीर यांनी त्यांचा सत्कार केला. खांडे यांचे मुंडे कुटुंबीय आणि भाजपशी जवळचे संबंध आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट हा आगामी काळात जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. यावेळी नूर लाला, मुसाखान पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...