आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन विहिरी:जिल्हाधिकाऱ्यांनी केली विसर्जन विहिरीची पाहणी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या शुक्रवारी, ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने बीड शहरातील विसर्जनाच्या मार्गाची मंगळवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भरपावसात पाहणी केली. शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या ठिकाणी वीजेचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बीड शहरातील पेठ बीड भागातील कंकालेश्वर महादेव मंदिर परिसरातील विहिरीमध्ये गणेश मंडळांच्या वतीने गणेशाचे विसर्जन करण्यात येते. मंगळवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सदरील विहिरीची पाहणी केली. त्यांनतर विसर्जन मिरवणुक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश नगरपालिकेला दिले. ज्या ठिकाणी विजेचा प्रश्‍न आहे तो प्रश्‍न तात्काळ सोडवण्याचे वीज वितरण कंपनीला निर्देशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या समवेत पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अति. पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख, तहसीलदार सुहास हजारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...