आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:नगर परिषद कर्मचारी संघटनेचा आज गेवराईत जिल्हा मेळावा

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी-संवर्ग कर्मचारी संघटनांच्या वतीने आज शुक्रवारी (१९ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांचा गेवराईत जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डी. पी. शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, प्रशासक नीता अंधारे, सेवानिवृत्त ज्येष्ठ कर्मचारी विष्णुपंत बेदरे, बाळकृष्ण भंडारी आदी उपस्थित राहणार आहेत. नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या जिल्हास्तरीय मेळाव्यास महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी - संवर्ग कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...