आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आ. क्षीरसागर आक्रमक

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसाने बीड मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देऊन त्यांना हातभार द्या, अशी आग्रही मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.३१) जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. या वेळी आ. क्षीरसागर यांनी शेती, वीजपुरवठा, रस्ते आदी प्रश्न मांडले.बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

आ. क्षीरसागर यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले. विमा कंपनीचे अधिकारी बांधावर गेले नाहीत, पंचनामे केले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या अटीशर्तीच्या मुद्द्््यावरून नाहक वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या विमा कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढावी. सर्वत्र थैमान घालणाऱ्या लम्पी रोगावरील लस प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा, अग्रिम, सततच्या पावसामुळे झालेले नुकसानीचे अनुदान लवकर मिळावे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना आदेशित करावे. चुकीची आकडेवारी दाखवणारे पर्जन्यमापक यंत्र बदलून नवीन बसविण्यात यावे अशा आग्रही मागण्या आ. क्षीरसागर यांनी केल्या.

अंजनवती, पाली सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी
अंजनवती व पाली येथे मंजूर असलेले सब स्टेशनचे काम प्रत्यक्ष चालू करण्यात यावे. याच मोठा फायदा परिसराला होणार आहे. तसेच, विद्युत विभागाला बील भरणातील ३३% प्रमाणे बीड शहर, बीड ग्रामीण शिरूर ग्रामीण शेतकऱ्यांना, नागरिकांना २५/६३/१०० चे रोहित्र देण्यात यावे व या विषयातील कामे करण्यात यावी. बीड शहरातून जाणारा मुख्य १२ किमीच्या रस्त्यावरील महावितरण कंपनीने पोल शिफ्टिंग करून देण्यात यावे आणि रस्त्याच्या दोन्हीही बाजूने नाली बांधकामाची मागणी आ. क्षीरसागर यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...