आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2021 मधील पुरस्कारांची घोषणा‎:तं­त्रज्ञानाच्या वापरासाठी‎ जिल्हा पोलिस अव्वल‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य पोलिस दलाकडून सन २०२१‎ मधील कामगिरीसाठी देण्यात‎ येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा‎ मंगळवारी झाली. यात, बीड जिल्हा‎ पोलिस दलाला ब श्रेणीमध्ये‎ तंत्रज्ञानाच्या वापरासाठीचा बेस्ट‎ पोलिस युनिट पुरस्कार जाहीर झाला‎ आहे.‎ राज्यात पोलिस घटाकांची‎ कामगिरी व कार्यक्षमता वाढवणे,‎ दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट काम करणे‎ आणि गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारीला‎ प्रतिबंध करतानाच कायदा आणि‎ सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काम‎ करणाऱ्या अधिकाररी, कर्मचाऱ्यांना‎ प्रोत्साहित करण्यासाठी‎ गतवर्षीपासून सर्वाेत्कृष्ट पोलिस घट‎ पुरस्कार सुरु करण्यात आले‎ आहेत.

यासाठी तीन श्रेणी तयार‎ करण्यात आल्या होत्या. बीड‎ जिल्ह्यात ब श्रेणीत समावेश होताे.‎ सन २०२१ मधील कामगिरीचे‎ मुल्यांकन करण्यासाठी समित्यांची‎ स्थापना केली गेली होती. या‎ पुरस्कारांची घोषणा मंगळवारी केली‎ गेली. ब श्रेणीत जालना पोलिस‎ दलाला सर्वोत्कृष्ट पोलिस घटक‎ म्हणून पुरस्कार मिळाला तर बीड‎ जिल्ह्याला तंत्रज्ञानाचा‎ वापरासाठीचा सर्वाेत्कृष्ट पुरस्कार‎ मिळाला आहे. कोविडच्या काळात‎ जिल्हापोलिस दलाने सोशल‎ मिडीयाचा वापर करुन नागरिकांशी‎ सुसंवाद ठेवला होता.‎

बातम्या आणखी आहेत...