आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:जिल्ह्यातील  प्राचार्य व लिपिक, समान संधी केंद्रप्रमुखांची बैठक

बीड2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड पॅटर्न राबवण्यासाठी ११ वी व १२ वी महाविद्यालयाचे प्राचार्य व लिपिक, समानसंधी केंद्राचे प्रमुख यांची बैठक बीड येथील मिलिया महाविद्यालयात पार पडली. या बैठकीस जात पडताळणी समितीच्या उपायुक्त एस.आर. मकरंद, जिल्हा परिषदेचे सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये. यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांनी जास्तीत जास्त ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थ्यानी अर्ज सादर करण्याचे आवाहन जातपडताळणी समितीच्या उपायुक्त आर.एस. मकरंद यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...