आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय महिला लोकशाही दिन:14 नोव्हेंबर रोजी होणार विभागीय लोकशाही दिन

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. तसेच नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रार करण्यासाठीचे अर्ज १५ दिवस आधी विहित नमुन्यामध्ये दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयाचे आवक शाखाप्रमुख यांच्याकडे स्वीकारण्यात येणार आहे.

विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पीडित महिलांनी विहित नमुन्यातील मुदतपूर्व अर्ज विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास यांच्याकडे सादर करावेत. अर्जाच्या दोन प्रति विभागीय लोकशाही दिनाच्या दिवशी विभागीय आयुक्तांकडे समक्ष पुन्हा सादर कराव्यात. जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही किंवा या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रारदाराचे समाधान झाले नाही असे सर्व प्रश्न विभागीय स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...