आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:डीजेची तक्रार केल्याने पिस्तूल लावून तरुणास मारहाण; परळीतील संभाजीनगर ठाण्यात पाच जणांवर गुन्हा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डीजेची तक्रार का केली म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार परळी शहरातील मिलिंदनगर भागात घडला. याप्रकरणी परळीतील संभाजीनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. हार्दिक संजय व्हावळे (१९) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याच्या तक्रारीनुसार, तू डीजे विरोधात तक्रार का केली असे म्हणत रूपेश रामभाऊ जगताप, मयूर ज्ञानोबा गोखले, संतोष रामभाऊ जगताप, रामभाऊ लिंबाजी जगताप आणि आदित्य ज्ञानोबा गोखले यांनी त्याला पिस्तूल दाखवून बेदम मारहाण केली. याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...