आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीनींशी संवाद‎:न घाबरता रोडरोमिओंची वेळीच‎ माहिती द्या, बंदोबस्त करू‎

केज‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत येताना आणि परत जाताना‎ रोडरोमिओंकडून होणाऱ्या त्रासास कंटाळून शाळा‎ सोडण्याचा अथवा इतर अनुचित गोष्टींचा विचार न‎ करता टवाळखोरांची माहिती वेळीच पोलिसांना‎ द्यावी. त्यांचा बंदोबस्त करू अशी ग्वाही केज‎ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर‎ वाघमोडे यांनी दिली.‎ केज तालुक्यातील नांदूर घाट येथील जिवन‎ प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील‎ मुलींशी संवाद साधून केज ठाण्याचे सहाय्यक‎ पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना‎ मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक फौजदार‎ अभिमान भालेराव, पोलीस नाईक रशीद शेख,‎ वाहन चालक हनुमंत गायकवाड यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. पुढे बोलताना सपोनि शंकर‎ वाघमोडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले भविष्य‎ उज्वल करण्यासाठी नियमितपणे अभ्यास करावा.‎

आपल्याला कोणत्या पदाची नोकरी करायची‎ आणि आपल्याला काय बनायचे आहे हे ध्येय‎ निश्चित करून त्याची तयारी करावी. आई, वडील‎ आणि गुरूंचा आदर, सन्मान करून त्यांचे नाव‎ उज्वल करावे असे आवाहन करीत मोबाईलच्या‎ अति वापरामुळे दुष्परिणाम सांगून इतर विषयावर‎ मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेचे‎ मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...