आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरगरीब, कष्टकरी, शेतकरी मोलमजुरी करणारे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून समाजामध्ये आपले नावलौकिक करणारे मुले-मुली पोलिस उपनिरीक्षक पदाचे दावेदार होत आहेत.ही अभिमानास्पद बाब असून चिकाटी, जिद्द, परिश्रम घेतले तर यश निश्चितच मिळते. आपण ज्या मातीत जन्म घेतला त्या “मातीला” व आपण जिच्या पोटी जन्म घेतला. त्या “मातेला” कदापिही विसरू नका. भविष्यात या पेक्षाही मोठे शिखर गाठाल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शेषराव जगताप यांनी केले. धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी जगताप हे बोलत होते. पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या ज्ञानेश्वर देवकते व कृष्णा कावळे यांचा हार, शाल, पुष्पगुच्छ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे, सेवालाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष बी.एम.पवार, बंडु नाईकवाडे, गटनेते अस्लम कुरेशी, आबेद शेख, बांधकाम सभापती बाबासाहेब वाघमारे, अॅड .तुकाराम आडे, सुनील डोंबाळे, सतिश खोटे, अकबर पठाण यांची उपस्थितीत होती. पुढे बोलताना जगताप म्हणाले की, तुम्ही या शिखरावर पोहोचला आहात ते पण काही कमी नाही. परंतु या पेक्षाही तुम्ही मोठे शिखर गाठावे व पोलिस अधीक्षक व्हावं आणि आपल्या जिल्ह्याची मान राज्यभर उंचवावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बी.एम.पवार, बन्सीभाऊ मुंडे, कृष्णा कावळे व ज्ञानेश्वर देवकते यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्ता वाकसे यांनी केले तर सूत्रसंचालन युवा व्याख्याते सूर्यनारायण यादव यांनी केले. यावेळी दिलीप चोरमले, कृष्णा खताळ, राहुल वाघमोडे, मगर, चौरे, चोरमले हजर होते.
युवकांनी प्रेरणा घ्यावी महाराष्ट्रात धनगर समाजाच्या ५५ उमेदवारांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली असून समाजासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. अतिशय खडतर प्रवास करुन हे विद्यार्थी यशोशिखरावर पोहोचले आहेत. समाजातील इतर युवकांनी यांची प्रेरणा घेऊन जिद्द, चिकाटी मनाशी बाळगून प्रचंड अभ्यास नावलौकिक करावे, असे आवाहन दत्ता वाकसेंनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.