आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष:शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका; आघाडीचा धर्म पाळा, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे आवाहन

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका. आघाडीचा धर्म पाळा, असे स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले आहे. तसेच, टक्केवारी घेणे आणि 17 कोटींच्या भ्रष्टाचारात राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जेल मध्ये जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आपसात मतभेद नको!
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे दोन्ही आपले नेते आहेत. त्यामुळे बीडमध्ये आपापसात वाद निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. तसेच, शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून मुस्लिम कार्यकर्त्यांनी संकोच बाळगण्याचे काहीही कारण नसल्याचे ते म्हणाले. आज या कार्यक्रमात अब्दुल सत्तारांनाही घेऊन आलो असतो. त्यांनी सिल्लोड भागात भाजप पूर्ण साफ करून टाकली. त्याचपद्धतीने शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...