आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या हंगामात पीक आले नाही म्हणून यंदा घ्यायचेच नाही हा अट्टाहास चुकीचा आहे. असे मत व्हाइट गोल्ड ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन जाधव यांनी केले. मंगळवारी धारुर येथ्ज्ञील नगरेश्वर मंदीरात बालाघाट प्रतीष्ठानने आयोजीत केलेल्या रक्तदान, मोफत माती परीक्षण व शेतकरी मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. जागतिक रक्तदाता दिन व दिवंगत कॅप्टन राजपालसिंह हजारी यांच्या २५ व्या स्मृती दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी भाजप नेते रमेश आडसकर होते. कार्यक्रमास अंबेजोगाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे , माजी नगराध्यक्ष शेषराव फावडे, अर्जुन गायकवाड, उत्तमलाल तोष्णीवाल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, युवा नेते बाबरी मुंडे, उदयसिंह दिख्खत , पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुनील कावळे, राम शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ठोंबरे म्हणाले, २५ वर्षापासून प्रतिष्ठान शेतकऱ्याचा केंद्रबिंदू माणनू स्तुत्य उपक्रम राबवीत आहे.
कृषी क्षेत्रात माती परीक्षण करूनच शेती करावी. दूध क्षेत्रात दूध उत्पादनात मोठा वाव आहे. गजानन जाधव म्हणाले, सध्या मराठवाड्यात वादळी पाऊस सुरू आहे. जोपर्यंत ७५ ते १०० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. यानंतर त्यांनी सोयाबीन तूर कापूस याच संदर्भात उत्पदन्न वाढीसाठी घ्यावयाची काळजी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाघाट प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ .स्वरुपसिंह हजारी यांनी तर सूत्रसंचालन मोहन भोसले यांनी केले.
धारुर येथे शिबिरात रक्तदान करताना नागरिक.
१४६ जणांचे रक्तदान यावेळी जागतिक रक्तदान दिनाचे औचत्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात १४६ दात्यांनी रक्तदान केले तर माती परिक्षण शिबिरात ६०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी या ठिकाणी माती परीक्षणा साठी माती नमुने दिले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप भाजपचे युवा नेते रमेशराव आडसकर यांनी केला.
१४६ जणांचे रक्तदान यावेळी जागतिक रक्तदान दिनाचे औचत्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात १४६ दात्यांनी रक्तदान केले तर माती परिक्षण शिबिरात ६०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी या ठिकाणी माती परीक्षणा साठी माती नमुने दिले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप भाजपचे युवा नेते रमेशराव आडसकर यांनी केला.
धारुर येथे शिबिरात रक्तदान करताना नागरिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.