आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राची दखल:तुम्ही काळजी करू नका...बघू काय करायचे ते... शिंदेंनी पूजाला दिला धीर

वडवणी/ जानकीराम उजगरे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही किती दिवसांपूर्वी जमीन विक्री केली होती ? ती कशासाठी व कोणाला विक्री केली ? त्या माणसाचा पत्ता, फोन नंबर काय आहे ते मला सांगा? तुम्ही काळजी करू नका. बघू काय करायचे असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुद्द पुनंदगाव येथील शेतकरी शेखर सावंत यांची मुलगी पूजा सावंत यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर बीड जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पुनंदगावला भेट देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून आठ दिवसांत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील मूळ रहिवासी व सध्या माजलगाव तालुक्यातील पुनंदगाव येथे राहत असलेले शेतकरी शेखर सावंत यांनी दीड वर्षापूर्वी कुप्पा गावातील सावकारकीचा आरोप असलेले मारुती वाघमारे यांच्याकडून मुलगी पूजा सावंत हिच्या लग्नासाठी १० लाख रुपयांना दोन एकर जमीन विक्री करून खरेदीखत करून घेतले होते. दहा लाख रुपयांची परतफेड करूनही वाघमारे जमीन परत करत नव्हते. आम्ही जिवंत राहून काय करायचे. आम्हाला मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असे पत्र शेतकऱ्याची मुलगी पूजा सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले होते. त्याची दखल शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट पूजाशी मोबाइलवरून संवाद साधला.

मोबाइलवरून कैफियत मांडतांना पूजाने अश्रूला वाट मोकळी करून दिली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्ही काळजी करू नका बघू काय करायचे ते, असे सांगितले. हा संवाद झाल्यांनतर मुख्यमंत्र्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी शर्मा, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार वर्षा मनाळे, वडवणीचे तहसीलदार दत्ता भारस्कर, जिल्हा निबंधक जी.के.परदेशी, तलाठी यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देत चौकशी केली.

आठ दिवसांत कारवाई करू व्याजाच्या पैशात लिहून दिलेली जमीन परत मिळावी अशी मागणी शेतकऱ्याच्या मुलीने मुख्यमंत्र्याकंडे केली. खरेदीखत हे योग्य आहे की अयोग्य याची शहानिशा करून यंत्रणेकडून अहवाल प्राप्त होताच आठ दिवसांत कारवाई करू, असे आश्वासन दिले असून चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली आहे.

घटनास्थळी मारुती वाघमारेही होते हजर
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा शेतकरी शेखर सावंत यांच्या घरी पुनंदगाव येथे भेट देण्यासाठी येणार असल्याचे समजताच मारुती वाघमारे पुनंदगाव येथे हजर झाले. त्यांनी शेतकऱ्याकडून मी जमीन खरेदी केली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. सावकारकीचा आरोप झालेला शेतकरीच जिल्हाधिकाऱ्यांसमोर न्याय मागत होता.

दीड वर्षापूर्वी मी जमीन विकत घेतली
दीड वर्षांपूर्वी दोन एकर जमीन मी २० लाख रुपयांना विकत घेऊन खरेदीखत करून घेतले होते. जमिनीचा फेरफार माझ्या नावे असून जमीन दीड वर्षापासून मी कसत आहे. माझ्या पाचही मुलांची शपथ घेऊन सांगतो मी ती जमीन खरेदी केलेली आहे. मला या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. -मारुती वाघमारे, कुप्पा, ता. वडवणी

बातम्या आणखी आहेत...