आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला रुग्णाशी असभ्य वर्तनाचा आरोप:डॉ. बांगर यांची नियुक्ती रद्दसाठी बीडमध्ये आंदोलन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला रुग्णाशी असभ्य वर्तनाच्या आरोपानंतर कारवाई झालेल्या नेकनूर कुटीर रुग्णालयातील डॉ. अशोक बांगर यांना आरोग्य विभागाने पुन्हा नेकनूरमध्येच नियुक्ती दिली आहे. ही नियुक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

नेकनूर कुटीर रुग्णालयात कार्यरत असताना डॉ. अशोक बांगर यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एका महिला रुग्णाने असभ्य वर्तनाचा आरोप केला होता. ते मद्यपान करून कर्तव्यावर येत असल्याच्या तक्रारीही होत्या. याबाबत तीन सदस्यीय समितीने चौकशी करून निलंबनाची शिरफास केली होती. यावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निलंबनाचा प्रस्तावही पाठवला गेला हाेता.

दरम्यान, पवार यांनी निलंबनाऐवजी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बांगर यांना प्रतिनियुक्ती दिली होती. मात्र, आता सर्वच प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्याने बांगर यांना पुन्हा नेकनूर रुग्णालयात नियुक्ती दिली गेली आहे. ही नियुक्ती रद्द करून बांगर यांना निलंबित करावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक साबळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात संतोष भोसले, संजय खामकर, अनिल माने, गौतम घडशिंगे, प्रदीप वाघमारे, अमोल खामकर आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...