आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ; माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती सप्ताह

गेवराई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा माझी वसुंधरा अभियान आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह या अंतर्गत अट्टल महाविद्यालयात वृक्षरोपण कार्यक्रम झाला.

पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी पाळा. कचरा जाळणे टाळा, वायू प्रदूषणाला ब्रेक लावा. ओल्या व सुक्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा, आरोग्याचे नियम पाळा. हे संदेश देणारे विविध उपक्रम सध्या राबविले जात आहे. या अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करून‘माझी वसुंधरा’ या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला जात आहे.

विद्यार्थ्यांची विद्यापीठीय परीक्षा सुरू असल्याने उपलब्ध विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी दिले. डॉ. समाधान इंगळे, डॉ. वृषाली गव्हाणे, डॉ. राहुल माने, डॉ. अमोल शिरसाट हे सर्व कार्यक्रमाधिकारी पुढाकार घेऊन सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या संपूर्ण उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

वृक्षारोपण प्रसंगी उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत पांगरीकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रवीण सोनुने, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, कार्यालय अधीक्षक भागवत गवंडी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

दरम्यान, या अभियानात महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण करुन या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. विद्यार्थिही मोठ्या संख्येने हजर होते.

बातम्या आणखी आहेत...