आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन मेडिकल असोसिएशन:डॉ. इंगोले यांचे कार्य प्रेरणादायी

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांचे कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे. ते कायम आपल्या योगदानातून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.

अंबाजोगाई येथे डॉ. इंगोलेंच्या वतीने नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग निदान, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिर, अंबाजोगाईतील पत्रकारांसाठी मोफत हृदयरोग निदान, मधुमेह निदान, रक्त तपासणी, आरोग्य निदान शिबीर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांकरिता उबदार ब्लँकेट वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर वाटप, वह्या व पेन वाटप तसेच शहरात विविध भागात वृक्षारोपण, स्वाराती रूग्णांना फळ वाटप, वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण अशा विविध उपक्रम पार पडले. समाधान रुग्णालयातील शिबिराप्रसंगी उद‌्घाटक माजी आ. संजय दौंड, प्रमुख अतिथी माजी आमदार पृथ्विराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, मनोज लखेरा, बबनराव लोमटे, एस.बी.सय्यद, दत्तात्रय अंबेकर, गजानन मुडेगावकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...