आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:डाॅ. ज्योती मेटे यांना विधान परिषद सदस्यपदी संधी द्यावी; अॅड. शहाणेंची मागणी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्रामचे अध्यक्ष स्व. विनायकराव मेटे हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यातील गाव, वाडीवस्तीवरील प्रत्येकाला माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी चाळीस वर्षांपासून जागर केला होता. मागील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ ते राजकारण, समाजकारणात सक्रीय होते. त्यांच्या सामाजिक कार्याला त्यांच्या पश्चातही सुरु ठेवण्यासाठी ज्योती मेटे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम महिला आघाडी शहर अध्यक्षा अॅड. पूजा शहाणे यांनी केली आहे.

स्व. मेटे यांनी राज्याच्या राजकारणावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या प्रवासाच्या साक्षीदार व साथीदार असलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.ज्योती मेटे या प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांना समाजकारणाचीही आवड आहे. साहेबांच्या समाजकारणात पडद्यामागील महत्त्वाची भूमिका ज्योतीताईंनी खूप चांगल्या प्रकारे निभावली आहे. बीड शहरात महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या अनेक सामाजिक उपक्रम व कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केले. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी शहाणे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...