आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. साळुंकेंच्या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा म. वि. गोखले स्मृती पुरस्कार मराठवाड्यातील प्रसिद्ध रंगकर्मी व साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांच्या ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे.

‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ या मराठवाड्याच्या रंगभूमीच्या संशोधनावर आधारित चिकित्सा करणारा पहिला मूलभूत ग्रंथ असून हा पुरस्कार २०१९ या वर्षासाठी उत्कृष्ट वाङ्मयीन समीक्षा व संशोधन ग्रंथासाठी दिल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे व उद्धव कानडे यांनी दिली. ज्येष्ठ कवयित्री सूर्यबाला आणि विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते येत्या १२ ऑक्टोबरला पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा ग्रंथ औरंगाबादच्या कैलास पब्लिकेशन तर्फे के. एस. अतकरे यांनी प्रकाशित केला. पुरस्काराबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, परिषदेचे कार्यवाह डाॅ. दादा गोरे, के. एस. अतकरे, प्रा. किरण सगर, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर, काॅ. नामदेव चव्हाण, नगरसेवक वाघमारे, मसापच्या बीड शाखेचे कार्यवाह प्राचार्य जे. एम. पैठणे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...