आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातारीख ५ सप्टेंबर २०२०...वेळ रात्री ११..परळीच्या रामनगर येथील मुंडे हॉस्पिटल परिसरात अचानक वाहनांचा ताफा येतो. क्षणार्धात रुग्णालयाची इमारत १०० पोलिसांकडून वेढली जाते. १० अधिकारी इमारतीत प्रवेश करतात अन् ८ तासांच्या कारवाईनंतर विनापरवाना सुरू असलेल्या रुग्णालयाचा भंडाफोड केला जातो... एखाद्या चित्रपटाला शोभावा असा प्रसंग परळीच्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयावर झालेल्या कारवाईदरम्यान घडला होता. बुधवारी या प्रकरणात डॉ. मुंडेला ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गर्भलिंगनिदान व अवैध गर्भपात प्रकरणात २०१० व २०१२ मध्ये डॉ. सुदाम मुंडेवर गुन्हे नोंद होते. या प्रकरणात २०१५ मध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने त्याचा वैद्यकीय व्यवसाय परवाना ऑक्टोबर २०२० पर्यंत रद्द केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये डॉ. मुंडेला बीडच्या सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. यात सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्याने जामीन मिळवला होता.
जामीनकाळात मुंडेने विनापरवाना रुग्णालय थाटले होते. २०२० मध्ये या रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांवर उपचार केले होते. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणाबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आली होती. तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. थोरातांच्या नेतृत्वात मुंडेच्या या रुग्णालयावर छाप्याने नियोजन केले गेले. ५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री कारवाई झाली होती. यात, लाखोंचा औषधी साठा, गर्भपातासाठीचे आवश्यक साहित्य जप्त केले होते. डॉ. मुंडेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात व इतर अधिकाऱ्यांना जिवे मारेन अशी धमकी दिली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद केला होता. बुधवारी या प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयाने सुदाम मुंडेला दोषी ठरवून ४ वर्षांची शिक्षा सुनावली.
डाॅ. सुदाम मुंडेने थाटलेल्या या हाॅस्पिटलवर कारवाई केली गेली.
दहा कलमांन्वये झाला होता गुन्हा नोंद विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंध कायदा, वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, मुंबई शुश्रूषा नोंदणी कायदा, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, रुग्णांची फसवणूक करणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पुन्हा नोंदणीची होती तयारी जून २०१५ मध्ये मुंडे दांपत्याला अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने गर्भलिंगनिदानात दोषी ठरवून ४ वर्षांची शिक्षा व ८० हजार दंड ठोठावला होता. वैद्यकीय परिषदेने त्याचा वैद्यकीय व्यवसाय परवानाही ऑक्टोबर २०२० पर्यंत रद्द केला गेला होता. सप्टेंबर महिन्यात ही कारवाई झाली नसती तर पुढच्याच ऑक्टोबर २०२० महिन्यात सुदाम मुंडे हा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना पुन्हा मिळावा यासाठी अर्ज करणार होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.