आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरुरकासार येथील कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातील डॉ. नवनाथ ज्ञानोबा पवळे यांना समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व मुक्ता फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा गणुजी शिवाजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, एस आर टी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नारायण कांबळे, मयूर सरसेर, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कोल्हापूर विशाल लोंढे, विज्ञान संस्थेचे संचालक पी.जी साठे, भरत घाडगे, अमोल महापुरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. दरवर्षी महात्मा फुले स्मृति दिनाच्या दिवशी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या यशाबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथामाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. दीपा ताई क्षीरसागर ,आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश मचाले, प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे व महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.